शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

हिंजवडीत दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी चायनिज सेंटर, हाॅटेलवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 19:18 IST

सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

पिंपरी : दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी हिंजवडी येथील चायनिज सेंटर तसेच हाॅटेलवर छापा मारून एक लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. 

योगेश राघु वाडेकर (वय ३२, रा. हिंजवडी) तसेच गणेश प्रभाकर गाणीग (वय ३२, रा. हिंजवडी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वाडेकर हा स्वरा चायनिज अ‍ॅण्ड तंदूर पाॅईंट या चायनिज सेंटरचा चालक आहे. तर आरोपी गाणीग हा खुशबू कबाब करी अ‍ॅण्ड बिर्याणी रेस्टाॅरन्ट या हाॅटेलचा चालक आहे. आरोपी हे चायनिज सेंटर तसेच हाॅटेलमध्ये दारुची अवैध विक्री करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून रोकड, देशीविदेशी दारू तसेच बिअरच्या बाटल्या, असा एकूण एक लाख २७ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कल्याण मटक्यावर छापाकल्याण मटका नावाच्या जुगारासाठी आरोपी शिवकुमार उर्फ बल्ली भाई पप्पू स्वामी मूरगन (वय ३५, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) हा लोकांकडून पैसे घेऊन आकडे लिहून देऊन जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड येथे सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यावेळी आरोपीकडे रोकड, मोबाईल, कल्याण मटक्याच्या चिठ्ठ्या, पेन , असे एकूण १५ हजार ५३० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य मिळून आले. आरोपी मूरगन तसेच इतर तीन जणांविरुद्ध याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhotelहॉटेलliquor banदारूबंदी