शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीच्या महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे ; शनिवारी होणार शिक्कामोर्तब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:04 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी  आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

ठळक मुद्देशनिवारी(दि. ४ ऑगस्ट ) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून शनिवारी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी  आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. यावेळेत सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. शनिवारी(दि. ४ ऑगस्ट ) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे, कामकाज पाहणार आहेत. ..............................असे आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल!भारतीय जनता पक्ष ७७, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शिवसेना ९, अपक्ष ५ आणि मनसे १ असे १२८ नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड