विरोधी पक्षनेतेपदी राहुल भोसले

By Admin | Updated: February 6, 2016 01:33 IST2016-02-06T01:33:30+5:302016-02-06T01:33:30+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँगे्रसचे राहुल भोसले यांची निवड झाली. महापालिकेत काँगे्रसचे १३ नगरसेवक

Rahul Bhosale as the Leader of the Opposition | विरोधी पक्षनेतेपदी राहुल भोसले

विरोधी पक्षनेतेपदी राहुल भोसले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँगे्रसचे राहुल भोसले यांची निवड झाली.
महापालिकेत काँगे्रसचे १३ नगरसेवक व राष्ट्रवादी काँगे्रसप्रणीत अपक्ष आघाडीचे आठ अशी एकूण २१ सदस्य संख्या आहे. काँगे्रस व अपक्ष आघाडीची विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, २१ संख्याबळाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी भोसले यांच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतचे पत्र महापौरांना दिले. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. हनुमंत भोसले, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, गीता मंचरकर, नगरसेविका आरती चोंधे, शकुंतला बनसोडे, विमल काळे, नगरसेवक गणेश लोंढे उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘‘प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणार असून, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन पार पाडणार आहे.’’(प्रतिनिधी)

Web Title: Rahul Bhosale as the Leader of the Opposition