शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड येथे पोलिसांशी हुज्जत घालून आत्महत्येचा प्रयत्न, चौघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:28 IST

आरडाओरडा करून आरोपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी करून दिली धमकी

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

पिंपरी : पोलीस चौकीत तक्रार देण्यास येऊन पोलिसांशी हुज्जत घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच अरेरावी करून पोलिसांना धमकी दिली. मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.तुषार बाबू मंजाळकर (वय २५), तेजस दिगंबर शिंदे (वय २४), जया बाबू मंजाळकर (वय ४६) आणि वंदना दिगंबर शिंदे (वय ४५, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी धर्मराज किसन तोडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथील रेशनिंगच्या दुकानाचे धान्य घेऊन वाहन आले होते. ते धान्य रेशन दुकानात उतरवून घेताना काही जणांनी अडथळा केला. त्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले. धान्य उतरवून देण्याबाबत काही हरकत असल्यास पोलीस चौकीत तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी पिंपरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मोहननगर पोलीस चौकीत पोहचले. तेथे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करून धमकी दिली. आरडाओरडा करून आरोपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी केली. तुम्ही आमच्या मुलांना मारून टाकताय का, आम्ही तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू, तुम्हाला आम्ही कोण आहोत, ते दाखवून देऊ, अशी धमकी आरोपी यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदीचा आदेश असताना विनाकारण घराबाहेर पडून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.---------------------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी