पुनावळे हल्ल्यामागे सराईत गुन्हेगार

By Admin | Updated: April 26, 2017 03:51 IST2017-04-26T03:51:33+5:302017-04-26T03:51:33+5:30

पुनावळे येथील ढवळे पेट्रोल पंपावरील कामगारावर झालेल्या खुनी हल्ल्यामागे पुनावळेतीलच सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले

PUNELE HALLAM SARAT CRIMINAL | पुनावळे हल्ल्यामागे सराईत गुन्हेगार

पुनावळे हल्ल्यामागे सराईत गुन्हेगार

वाकड : पुनावळे येथील ढवळे पेट्रोल पंपावरील कामगारावर झालेल्या खुनी हल्ल्यामागे पुनावळेतीलच सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले असून, केवळ पेट्रोल भरतानाच्या बाचाबाचीतून हल्लेखोरांनी हा जीवघेणा हल्ला केला होता. हिंजवडी पोलिसांचे तीन पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत़
प्रशांत गपाट (वय २९, रा. पुनावळे) असे हल्ला झालेल्या कामगाराचे नाव आहे. सोमवारी (दि़ २४) दुपारी येथील रसवंती समोर एक ट्रकचालकाशी आरोपींची जोराची भांडणे सुरू होती़ काय गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी प्रशांत व अन्य कामगार येथे गेले, तेव्हा यातील एका आरोपीने काय बघतोय ? तू आम्हाला खुन्नस देतोयस का ? थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेले़ हत्यारांसह आलेल्या या चौघांनी प्रशांतवर हल्ला केला.(वार्ताहर)

Web Title: PUNELE HALLAM SARAT CRIMINAL