शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

अहो ऐकलं का? पुण्यात पेट्रोल ९५ रुपये लिटर झालंय..., इंधन दरवाढीनं पुणेकरही त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 18:08 IST

पेट्रोलने गाठला ९५ रुपये मैलाचा दगड, सलग सातव्या दिवशी भाववाढ 

ठळक मुद्देइंधनच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले.

पिंपरी : इंधनाचे दर वेगाने शंभरीच्या दिशेने चालले आहेत. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने प्रतिलिटर ९५ रुपयांचा टप्पा पार केला. तर, डिझेलचे भाव ८५ रुपयांच्या घरात पोहोचले. शहरात सलग सातव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज आपला पूर्वीचा उच्चांक मोडत आहेत. शहरात २० नोव्हेंबर-२०२० पासून इंधनाच्या भावाचा घोडा उधळू लागला आहे. त्याला अद्यापही लगाम बसला नाही.

इंधनच्या दरात दररोज काही पैशांची वाढ होत आहे. पेट्रोलचा ९ फेब्रुवारीचा भाव ९३.४८ आणि डिझेलचा ८२.७४ रुपये प्रतिलिटर होता. या सात दिवसांत पेट्रोल १.६२ आणि डिझेल १.९४ रुपयांनी महागले. आंतरराष्ट्रीय बाजारात २०१३ साली क्रूड ऑईलची किंमत १४० डॉलरच्या घरात गेली होती. त्यावेळी पेट्रोलचा भाव उच्चांकी ९३ रुपयांवर गेला होता. तर, डिझेलचा या पूर्वीचा उच्चांक ७८ रुपये प्रतिलिटर होता. या उच्चांकी भावाचे आकडे केव्हाच मागे पडले आहेत.

तीन महिन्यात पेट्रोल साडेआठ, डिझेल नऊ रुपयांनी महागले

गेल्या तीन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या भावात प्रतिलिटरमागे ७.४३ आणि डिझेलच्या भावात ८.९७ रुपयांनी वाढ झाली. शहरात २० नोव्हेंबर २०२० रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८७.६७ रुपये होता. तर, डिझेलचा भाव ७५.७१ रुपये प्रतिलिटर होता. सोमवारी (दि. १५) पेट्रोलच्या भावाने ९५.१० आणि डिझेलने ८४.६८ रुपयांवर झेप घेतली.

प्रकार २० नोव्हेंबर-२०२० ते १९ डिसेंबर २० १९ जानेवारी-२०२१ १५ फेब्रुवारी-२१

पेट्रोल ८७.६७                         ९०                         ९१.४७             ९५.१०डिझेल ७५.७१                         ७८.९७                        ८०.५८             ८४.६८ 

टॅग्स :Petrolपेट्रोलPuneपुणे