शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कधी येणार घरी ? युद्धाच्या सावटाखाली दुबईत अडकले पिंपरी-चिंचवडकर

By विश्वास मोरे | Updated: March 3, 2026 09:14 IST

- आईच्या डोळ्यांत अश्रू, दुबईत अडकलेले लेकरू; मायदेशी परतीची आस लागली

पिंपरी : दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटन व अभ्यासदौरे, पुरस्कार सोहळे आदी विविध कारणांसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातून दुबईला गेलेले साठहून अधिक नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे आपण मायदेशी घरी कधी परतणार? अशी चिंता पर्यटकांना लागली आहे तर भारतातील त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला आहे. दुबईमध्ये सतर्कता असून मानसिक भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रत्यक्षात गंभीर परिस्थिती नाही, अशा प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केल्या.पिंपरी-चिंचवड शहरातून काही ग्रुप पिंपरी-चिंचवड शहरातून काही ग्रुप दुबई आणि आखाती देशांमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. किती लोक असावेत अशी नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, इंदिरा महविद्यालय, भोसरीतील दोन ग्रुप पर्यटनाला गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यात मानसिक भीतीचे वातावरण आहे. भारतातील पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला आहे. याबाबत आपबिती सांगितली. परंतु, कुटुंबीयांना फार काळजी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

पुणे व भोसरी परिसरातील ४० जणांचा ग्रुप अडकलादेशभरातील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे ३७५ जण दुबईला पर्यटनासाठी आणि कार्यक्रमासाठी प्रोत्साहन सोहळ्यासाठी गेले होते. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४० जणांचा समावेश आहे. त्यात कंपनीचे पुण्याचे प्रमुख संदीप सूर्यवंशी असून, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचाही समावेळ आहेत. त्यांनी दुबईतील आपबिती सांगितली.

आई रडली, मायदेशी परतण्याची प्रतीक्षानरेंद्र बनसोडे म्हणाले, आम्ही २६ फेब्रुवारीला दुबईमध्ये आलो. त्यानंतर काही ठिकाणी पर्यटन केले. मात्र, सतर्कतेच्या सूचना दिल्याने आज दिवसभरातील सर्व पर्यटनाचे कार्यक्रम रद्द केले. आम्ही सध्या दुबई फेस्टिव्हल सिटीमधील हॉलिडे इन हॉटेलमध्ये आहोत. कालपासून येथील नागरिकांमध्ये थोडी भीती जाणवत आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही. येथील प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाच्या मोबाइलवर दक्षतेसंदर्भात सायरन वाजवला जात आहे माध्यमांमध्ये युद्धाच्या बातम्या येत असल्याने आमचे नातेवाईक घाबरलेले आहेत. सातत्याने चौकशी करत आहेत. आज तर माझ्या आईने फोन करून विचारणा केली. तिच्या डोळ्यांत पाणी आले होते. येथील वातावरण अजूनही सुरक्षित आहे. आम्ही सोमवारी भारतात परतणार होतो, मात्र त्या नियोजनामध्ये बदल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Residents Stranded in Dubai Amid War Fears, Await Return

Web Summary : Over 60 Pimpri-Chinchwad residents are stuck in Dubai due to war fears, creating anxiety among families back home. Though alert, the situation isn't dire, but return plans are disrupted, causing distress and uncertainty.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड