शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड डीपीवर चाळीस हजारांहून अधिक हरकती जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:30 IST

- सूचना व हरकती नोंदविण्यासाठी उद्या अखेरचा दिवस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने नवीन सुधारित प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह भूमिपुत्रांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे डीपीमधील विविध आरक्षणांबाबत हरकतींचा पाऊस पडत आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे शुक्रवारपर्यंत (दि. ११) चाळीस हजाराहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकत व सूचना नोंदविण्यासाठी सोमवार (दि. १४) हा अखेरचा दिवस आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित डीपी आराखडा महापालिकेने तयार केला आहे. शहरातील २८ गावांच्या एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे तसेच सार्वजनिक सेवा व सुविधांसह नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. डीपीबाबत नागरिकांकडून १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. मात्र, डीपीमध्ये अनावश्यक आरक्षणे समाविष्ट केली गेली आहेत. दाट लोकवस्तीतून रस्ते व रिंगरोड प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच गरज नसतानाही मोठ्या संख्येने व्यापारी संकुले व इतर सुविधांसाठी आरक्षणे प्रस्तावित केली गेली आहेत.

प्रत्येक भागात दफनभूमीचे आरक्षणअल्पसंख्याक समाजाची संख्या कमी असताना मोठ्या भूखंडांवर दफनभूमीचे आरक्षण टाकले आहे. शहरातील प्रत्येक भागात दफनभूमीचे आरक्षण प्रस्तावित केल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप वाढला आहे. गरज नसताना दफनभूमीसाठी आरक्षणे टाळली गेली नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आरक्षणांबाबत मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या आहेत.डीपीविरोधात मोर्चे व आंदोलन

महापालिकेच्या सुधारित डीपीला अन्यायकारक ठरविण्यात येत असून, याच्याविरोधात शहरात मोर्चे, आंदोलन आणि धरणे सुरू आहे. शहरातील नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. शिल्लक असलेल्या शेतजमिनीवर आरक्षणे टाकल्याने भूमिपुत्रांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. डीपीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी डीपी बिल्डरांच्या हितासाठी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच डीपी तयार करण्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे