शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:13 IST

Pune Crime - सोशल मीडियावर ‘लाईक्स’साठी जीवाशी खेळ; वाकड पोलिसांची तात्काळ कारवाई, तरुणाची लेखी माफी

पिंपरी-चिंचवड -  सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याची वाढती प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या ‘थार’ गाडीने भररस्त्यात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. मात्र, त्याचा हा ‘स्वॅग’ वाकड पोलिसांसमोर फार काळ टिकला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने केवळ काही सेकंदांची रील बनवण्यासाठी गजबजलेल्या रस्त्यावर भरधाव वेगात वाहन चालवले. एवढेच नव्हे, तर त्याने थार गाडी चक्क फूटपाथवर चढवून रॅश ड्रायव्हिंग केले. या प्रकारामुळे पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.ही संपूर्ण स्टंटबाजी त्याने अभिमानाने सोशल मीडियावर पोस्ट केली. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि पोलिसांनीही तात्काळ याची दखल घेतली. वाकड पोलिसांनी तांत्रिक तपास, सोशल मीडिया अकाउंट आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ‘रील स्टार’चा सर्व तोरा उतरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष त्याने आपली चूक मान्य करत हात जोडून माफी मागितली. “पुन्हा कधीही अशा प्रकारची स्टंटबाजी करणार नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन,” असे लेखी आश्वासनही त्याने दिले. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित तरुणावर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी तरुणांना इशारा देत म्हटले आहे की, सोशल मीडियासाठी कायद्याशी खेळ केल्यास कठोर कारवाई अटळ आहे. या तडकाफडकी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा प्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thar Stunt Gone Wrong: Pimpri-Chinchwad Youth Apologizes After Police Action

Web Summary : A Pimpri-Chinchwad youth's dangerous Thar stunt for social media fame backfired. Wakad police swiftly arrested him after the video went viral. He apologized and promised to follow traffic rules. Police warned against social media stunts.
टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड