शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत चमकोगिरीवाल्यांचा महापूर : श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:05 IST

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदत देताना घ्यावी काळजी, प्रशासनाचे आवाहन पूरग्रस्तांना मदत करावी या भावनेने शहरी भागातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकारसोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध राजकीय नेत्यांचा पुढाकार

पूरग्रस्तांना मदत देताना घ्यावी काळजी, प्रशासनाचे आवाहन पिंपरी : पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली संधीसाधू चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करीत असून, पूरग्रस्तांचे नाव करून भावनेच्या भरात आपली फसवणूक होऊ शकते, त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करताना जागरूक रहाणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध घेतली जात आहे. पूरग्रस्तांचे नाव पुढे करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे सावधान...कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने निवारा कॅम्प निर्माण केले आहेत. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने तर कोल्हापूरमध्ये हेलिकॉप्टरने वस्तू पाठविल्या जात आहेत. पूरग्रस्तांना मदत करावी या भावनेने शहरी भागातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, मदत कशी आणि कोणाकडे करावी याबाबत माहिती नसल्याने नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.मदत सामान्यांची, चमकोगिरी नेत्यांची पूरग्रस्तांना मदत करावी, असे फलक विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी शहरात लावले आहेत. नागरिकांकडून मदत घेऊन त्यावर चमकोगिरी करण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या मदतीवर राजकीय नेते भाव खात आहेत. फोटोसेशन करीत आहेत.   तसेच सोशल मीडियावर व्हायरल करुन श्रेय लुटण्याचे काम केले जात आहे........पूरग्रस्तांसाठी विविध संस्था, संघटनांच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे. हे माणुसकीचे, मानवतेचे उत्तम लक्षण आहे. पूरग्रस्तांना मदत देताना आपण कोणाकडे आणि कोणत्या संस्थेकडे देतोय याबाबत सजग असणे गरजेचे आहे. तसेच आर्थिक स्वरूपाची मदत मुख्यमंत्री साहायता निधीस थेट देता येणार आहे. तसेच वस्तू स्वरुपातील मदत विभागीय आयुक्त कार्यालयात देता येणार आहे. मदत गरजूपर्यंत पोहोचविली गेली तरच मदतीचा हेतू साध्य होईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.......पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाºया नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने मदत कक्ष निर्माण केला आहे. त्यामध्ये वस्तू स्वरुपातील मदत जमा करता येणार आहे. 2नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करावयाची असल्यास ही मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करता येणार आहे. अन्य कोणाकडेही मदत देऊ नये. 3विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरूपात मदत जमा करता येणार आहे. यात ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साड्या, टॉवेल सॅनिटीरी नॅपकिन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बमुर्डा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे पोशाख स्वीकारले जाणार आहेत. नवीन कपडे स्वीकारली जातील. 4जुने कपडे देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडिक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. साखर, मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा मालही स्वीकारण्यात येणार आहे.

........राजकीय नेत्यांचा पुढाकारविविध संस्था आणि राजकीय नेत्यांनी स्वत:चे फोटो असणारे फ्लेक्स वेगवेगळ्या चौकांत लावले आहेत. ‘यांच्या पुढाकारातून... मदत निधी’ असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने इच्छुकांचीही चमकोगिरी सुरू आहे. सोशल मीडियावर वितभर केलेल्या कामाची हातभर प्रसिद्ध घेतली जात आहे. तसेच काही महाभागांनी आपले स्वत:चे बँक खाते क्रमांकही दिले आहेत. त्यामुळे मदत करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपण कोणत्या संस्थेला मदत करतो आहे, त्या संस्थेची विश्वासार्हता पाहणेही गरजेचे आहे. ......रोख स्वरूपात रक्कम गोळा करण्याचे प्रकार सुरू विविध सोसायट्या, गृहनिर्माण संस्था, विविध संघटनांच्या वतीने रोख स्वरूपात रक्कम गोळा केली जात आहे. ही रक्कम कोणाकडे आणि कशी देणार? याबाबत देणगी आणि मदत देणाºयांना माहिती घेणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेला रोख रक्कम देण्याऐवजी मुख्यमंत्री कार्यालयाने निर्माण केलेल्या मुख्यमंत्री साहायता निधीच्या नावाने धनादेश देणे गरजेचे आहे. रोख रक्कम देताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेfloodपूर