शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

मातंग समाज विकासासाठी निधी देऊ - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 1:50 AM

आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजानेदेखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे.

पिंपरी - आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजानेदेखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. राज्य सरकार मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून, मातंग समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसंबंधी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष व सचिव मधुकर कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे, प्रा. डॉ. राम कांबळे, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रा. पंडित सूर्यवंशी, प्रा. डॉ. चागंदेव कांबळे, प्रा. सुभाष वायदंडे, प्रा. सागर रधंवे, स्वप्निल भिंगारदिवे, संदीप ठोंबरे, नितीन दिनकर, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, पूजा देडे, वैशाली थोरात उपस्थित होते. मधुकर कांबळे, अमित गोरखे यांनी मातंग समाजाचे प्रश्न मांडले.क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून नव्या स्वरूपात सुरू करणे याविषयी उपाययोजना आणि त्यांचे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या विविध योजनांची नव्या स्वरूपात पुनर्रचना करणे, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेचे नाव बदलणे, यासह समाज विकासासाठी कृतिशील उपाययोजना करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnewsबातम्या