राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जानकरांचा निषेध
By Admin | Updated: October 13, 2016 02:03 IST2016-10-13T02:03:14+5:302016-10-13T02:03:14+5:30
पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बीड येथील जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल, तसेच बारामतीविषयी अनुद्गार

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जानकरांचा निषेध
पिंपरी : पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बीड येथील जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल, तसेच बारामतीविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळ तयार करून शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जोडो मारो आंदोलन केले. पिंपरी चौकात त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.
राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले. त्यामध्ये उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आझम पानसरे, नाना काटे, सुजाता पालांडे, शमीम पठाण, मंदाकिनी ठाकरे, वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख, दिलीप गोते, श्रीधर वाल्हेकर, नीता परदेशी, अरुणा कुंभार, कविता खराडे यांनी सहभाग घेतला. भाजपाच्या मंत्र्यांकडे विकासाचा अजेंडा नसल्याने ते प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करू लागले
आहेत, अशी टीका शहराध्यक्ष वाघेरे यांनी केली. (प्रतिनिधी)
जानकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा
४पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. मंत्रिपदाची जबाबदारी असताना केलेले असे हे वक्तव्य त्यांच्या मंत्रिपदाचा तसेच जनतेचा अवमान करणारे आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी केली आहे.