शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

By नारायण बडगुजर | Updated: February 23, 2024 09:11 IST

संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता

पिंपरी : लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. लाॅजवर छापा मारून कारवाई करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. वडमुखवाडी येथील खडीमशीन रस्त्यावरील सनशाईन लॉज येथे कारवाई केली.

नितीन रावसाहेब कोकरे (२८, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक केलेल्या लॉज मालकाचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस हवालदार मारुती करचुंडे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील खडीमशीन रस्त्यावर सनशाईन लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. त्यानुसार पोलिसांनी सनशाईन लॉजवर मंगळवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये लॉज मालक नितीन कोकरे याला ताब्यात घेतले. तसेच पीडित दोन महिलांची सुटका केली.  दोन हजार ९० रुपये रोख रक्कम जप्त केली. 

पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसProstitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारी