देहूत रत्नमाला करंडे यांचा प्रचार

By Admin | Updated: February 17, 2017 04:47 IST2017-02-17T04:47:27+5:302017-02-17T04:47:27+5:30

देहूगाव लोहगाव-निरगुडी वडगाव शिंदे गणातील अपक्ष उमेदवार रत्नमाला साहेबराव करंडे यांनी देहूगाव गावठाण वार्ड क्रमांक दोन

Promotion of Dehut Ratnamtala Karande | देहूत रत्नमाला करंडे यांचा प्रचार

देहूत रत्नमाला करंडे यांचा प्रचार

देहूगाव : देहूगाव लोहगाव-निरगुडी वडगाव शिंदे गणातील अपक्ष उमेदवार रत्नमाला साहेबराव करंडे यांनी देहूगाव गावठाण वार्ड क्रमांक दोन, वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक सहामधील काही भागातील मतदारांशी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन प्रचार केला.
देहूगाव, लोहगाव-निरगुडी, वडगाव शिंदे हा गण भौगोलिकदृष्ट्या किचकट असून, मतदारांपर्यंत पोहोचणे एक दिव्य आहे. अशा परिस्थितीत करंडे यांनी देहूगाव परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. या संपर्क रॅलीमध्ये करंडे यांनी देहूगावच्या विकासासाठी संधी द्यावी, असे आवाहन केले. प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदारांना भेटत असले, तरी खरे तर तुम्हाला वचन देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आल्याचे आवाहनही करंडे यांनी केले.

Web Title: Promotion of Dehut Ratnamtala Karande