शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचा असहकार; सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १४ महिन्यांपासून पगारच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST

सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचे पगार हे २०१२ सालापासून आडकविण्याचे प्रकारबँकांकडून, लोकांकडून घेतलेल्या कर्जाची करता येत नाही परतफेड

लोणावळा : सिंहगड कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगाराच्या मागणीसाठी सोमवार (दि. १८) पासून असहकार आंदोलन सुरु आहे. मागील १४ महिन्यांपासून शिक्षकांना पगारच नसल्याने गुरुजणांवर उपासमारीची वेळ आली आहे.इमाने इतबारे अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचे पगार हे २०१२ सालापासून अडकविण्याचे प्रकार सुरु असून ते आजपर्यंत कायम आहे. मागील १४ महिन्यांपासून प्राध्यापकांना पगार नसल्याने शिक्षकांनी संस्थेच्या आवारात असहकार कामबंद आंदोलन सुरु केले आहे.पगार मिळत नसल्याने प्राध्यापक कंगाल झाले आहेत. बँकांकडून, लोकांकडून घेतलेल्या कर्जाची त्यांना परतफेड करता येत नाही म्हणून घरातील दागिने, सोने, चांदी गावाकडील जमीन, घर विकावे लागले आहे. मागील पाच वर्षांपासून प्राध्यापकांचे पगार अडकवून त्यांची पिळवणूक संस्था करत आहे.

या आधी अनेकदा विनंती करून सुदधा पगार होत नसल्याने ते हतबल झाले आहेत. तसेच जे वारंवार पगाराच्या पैशांची मागणी करतात त्यांना कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जात आहे. अनेकांना आई, वडील, भाऊ  यांच्या उपचारांसाठी पैसे लागत आहेत म्हणून १४ नाही तर किमान ७ महिन्यांचा तरी पगार द्या अशी मागणी केली तरीदेखील पगार मिळाला नाही, असे प्राध्यापकांनी सांगितले. अडविलेले पगार तातडीने करा तसेच पुढील पगार नियमीत महिन्याच्या दहा तारखेला द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :sinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटagitationआंदोलनPuneपुणे