‘सावकारा’वर छापा

By Admin | Updated: March 21, 2017 05:21 IST2017-03-21T05:21:57+5:302017-03-21T05:21:57+5:30

अवैध सावकारी व्यवसाय करणा-या येथील एका व्यापा-याच्या घरावर छापा टाकून केलेल्या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Print on 'Savarkar' | ‘सावकारा’वर छापा

‘सावकारा’वर छापा

तळेगाव दाभाडे : अवैध सावकारी व्यवसाय करणा-या येथील एका व्यापा-याच्या घरावर छापा टाकून केलेल्या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामध्ये शंभर रुपयांचे सात कोरे बॉण्डपेपर, विविध बॅँकांचे सह्या केलेले ३३ कोरे धनादेश यासह काही आक्षेपार्ह कागदपत्रांचा समावेश आहे.
नरेश राजपती मिश्रा (रा. विद्या सहकारी गृहरचना संस्था, तळेगाव दाभाडे) अशी कारवाई केलेल्या अवैध सावकाराचे नाव आहे. या संदर्भात विकास बाबुराव लेदे (रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांनी ४ मार्च रोजी वडगाव मावळ येथील सावकारांचे सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Print on 'Savarkar'