शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या हातांनी केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 00:32 IST

२० लाखांची विक्री : दिवाळीनिमित्त भरविले वस्तूंचे प्रदर्शन

राहुल गायकवाड

पुणे : गेल्या १० वर्षांपासून पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन दिवाळी निमित्त भरविण्यात येते. यंदा ३० आॅक्टोबर रोजी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनात केवळ एका आठवड्यात विक्रमी अशी २० लाख ५७ हजार ९०६ रुपयांची विक्री झाली आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आयुष्यात अंधकार असलेल्या कैद्यांच्या जीवनात एक आशेचा किरण यानिमित्ताने आला आहे.

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कारागृहात विविध कामे करुन घेतली जातात. कपड्यांपासून ते खाण्याच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तू हे कैदी तयार करत असतात. खास दिवाळी निमित्त आकर्षक आकाशकंदील तसेच पणत्या इतर शोभेच्या वस्तू कैदी तयार करत असतात. गेल्या 10 वर्षांपासून येरवडा येथील कारागृहाच्या शोरुममध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. वषार्नुवर्षे या प्रदर्शनाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. यंदा 30 आॅक्टोबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कारागृह मुख्यालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार आदी उपस्थित होते. यंदा दिवाळीत सुरु करण्यात आलेल्या या प्रदर्शनात अवघ्या एका आठवड्यात प्रदर्शनातील वस्तूंची तब्बल २० लाख ५७ हजार ९०६ रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षी १५ लाख इतके होते. यंदा त्यात जवळजवळ साडेपाच लाखांची वाढ झाली आहे. यंदा या प्रदर्शनात सर्वाधिक लाकडी फर्निचर, हॅन्डलूमची कापडी उत्पादने व पर्यावरणपूरक आकाशकंदीलयांची मोठ्याप्रमाणावर विक्री झाली आहे.

कैदी शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक उत्पादनाचे साधन निर्माण व्हावे, तसेच त्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करता यावा या हेतूने कारागृहात कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा मोबदलाही त्यांना दिला जातो. कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगDiwaliदिवाळी