गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: September 23, 2015 03:23 IST2015-09-23T03:23:38+5:302015-09-23T03:23:38+5:30
गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह, बीएसएफ, स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), होमगार्ड, तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी

गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पिंपरी : गणेशोत्सव, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह, बीएसएफ, स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दल (क्यूआरटी), होमगार्ड, तसेच प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचारी अशी जादा कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे, या उद्देशाने वाहतूक नियोजन केले असून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते काही बदल केले आहेत. शहरातील विविध १४ घाटांवर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरात एकूण १४३५ गणेशोत्सव मंडळे आहेत. विविध १४ विसर्जन घाटांवर टप्प्याटप्प्याने विसर्जन होणार असले, तरी सातव्या, नवव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीदिनी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार असल्याने आतापासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चिंचवड येथील पवना घाट, पिंपरी सुभाषनगर येथील विसर्जन घाट, निगडीतील गणेश तलाव, सांगवीतील घाट आणि भोसरीतील तलाव या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दुचाकीवरील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातील दोन दुचाकीवर विविध ठिकाणी फेरफटका मारतील. ठिकठिकाणी टेहळणीसाठी ‘टॉवर’ उभारले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)