शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

महापालिका निवडणुकीची तयारी; शहरात १ ते १० जानेवारी दरम्यान भाजपाचे नवीन सदस्य नोंदणी अभियान

By विश्वास मोरे | Updated: December 26, 2024 17:02 IST

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जानेवारी या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हाती घेतले आहे.

पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदस्य नोंदणीच्या कामाला लागा, असे आवाहन आमदार हेमंत रासने यांनी केले.

भारतीय जनता पक्ष नवीन सदस्यता नोंदणी अभियानाचे पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे प्रभारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार रासने यांनी भाजपा पिंपरी चिंचवड कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्यता नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, अभियानाचे संयोजक संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शितल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, कविता हिंगे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, निलेश अष्टेकर, संदीप नखाते, राजेंद्र बाबर, प्रसाद कस्पटे, संतोष तापकीर, सहसंयोजक विजय शिनकर, अभिषेक देशपांडे, अमेय देशपांडे उपस्थित होते.

आमदार रासने म्हणाले, 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश संपादन केले आहे. महायुतीच्या सत्ता स्थापनेत भाजपा पदाधिकारी - कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. हा विजय निरंतर ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयासाठी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जानेवारी या कालावधीत राज्यभर नवीन सदस्य नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. यासाठी मंडल आणि बूथ स्तरावर संयोजक आणि सहसंयोजक यांच्यासह पदाधिकारी - कार्यकर्ते यांनी आपल्याला सोपवून दिलेल्या प्रभागांची जबाबदारी सांभाळून अभियान यशस्वी पार पाडायचे आहे.' संजय मंगोडेकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव ढाके यांनी आभार मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाVotingमतदान