अतिरिक्त आयुक्तपदी प्रवीण आष्टीकर?
By Admin | Updated: December 16, 2015 02:56 IST2015-12-16T02:56:59+5:302015-12-16T02:56:59+5:30
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यांच्या जागी पीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण आष्टीकर

अतिरिक्त आयुक्तपदी प्रवीण आष्टीकर?
पिंपरी : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यांच्या जागी पीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण आष्टीकर यांची वर्णी लागणार असल्याचे समजते.
तानाजी शिंदे जुलै २०१३मध्ये महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाले. त्यांनी यापूर्वी महापालिकेत सहायक आयुक्त म्हणूनही काम केले होते. जमिनीच्या वादातून एकाच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त शिंदे यांची मंगळवारी बदली झाल्याची चर्चा होती.
त्यांच्या जागेवर पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक
आष्टीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी पुणे महापालिकेत उपायुक्तपदावर काम केलेले आहे. (प्रतिनिधी)