रोझ लॅण्ड सोसायटीला वीजबचतीचा पुरस्कार
By Admin | Updated: February 28, 2016 03:45 IST2016-02-28T03:45:47+5:302016-02-28T03:45:47+5:30
वीज व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबचत केल्याबद्दल पिंपळे सौदागर येथील रोझ लॅण्ड हौसिंग सोसायटीला महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘अॅवॉर्ड आॅफ एक्सलंट

रोझ लॅण्ड सोसायटीला वीजबचतीचा पुरस्कार
सांगवी : वीज व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबचत केल्याबद्दल पिंपळे सौदागर येथील रोझ लॅण्ड हौसिंग सोसायटीला महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘अॅवॉर्ड आॅफ एक्सलंट इन एनर्जी कन्व्हेशन अॅण्ड मॅनेजमेंट’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
सोसायटीने वीज व्यवस्थापनासाठी विविध बदल केले. एलईडी बल्ब आणि उत्तम दर्जाच्या वीज पंप आणि बोअरवेल यंत्राचा वापर केला. यामुळे वर्षंभरात एकूण १ लाख ४६ हजार युनिटची बचत झाली. त्याद्वारे एकूण १६ लाख ९६ हजार रुपयांची बचत झाली आहे. त्याचबरोबर वीज तयार करण्यासाठी आणि वापरातून तयार होणारा कॉर्बन डायआॅक्साईड वायूची निर्मिती झाली आहे. यासाठी सुमारे १०९.५ टन झाडांच्या लाकडाची कत्तल झाली असती. या बचतीतून झाडांची ही कत्तल थांबण्यास मदत झाली आहे.
वीज बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतलेल्या सोसायटीच्या या उपक्रमामुळे शासनाचा हा पुरस्कार सोसायटीला प्रदान करण्यात आला. हौसींग सोसायटीचा विभागातील हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संतोष मसकर, आनंद दफ्तरदार, नगरसेवक नाना काटे यांनी तो स्विकारला. उपक्रमात सिद्धार्थ नाईक, चंदन चौरसिया, बाबासाहेब साठे, मोहित चतुर्वेदी, प्रशांत ढाकवे, अमोल बांगर आदींनी सहभाग घेतला. (वार्ताहर)