मोबाइल अॅपवरून करा खड्ड्यांची तक्रार
By Admin | Updated: July 9, 2016 03:50 IST2016-07-09T03:50:14+5:302016-07-09T03:50:14+5:30
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार आता मोबाइल अॅपवरद्वारे करता येऊ शकते. महापालिकेने ‘एम-पीसीएमसी’ या नावाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे अॅप उपलब्ध करून दिले

मोबाइल अॅपवरून करा खड्ड्यांची तक्रार
पिंपरी : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार आता मोबाइल अॅपवरद्वारे करता येऊ शकते. महापालिकेने ‘एम-पीसीएमसी’ या नावाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यात आपल्या भागातील खड्ड्याचा फोटो काढून ‘अपलोड’ केल्यास महापालिका त्वरित यंत्रणा राबवून खड्डा दुरुस्ती करणार आहे. विशेष म्हणजे खड्डे दुरुस्ती झाली की नाही, याचीही माहिती संबंधित तक्रारदाराला मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरी सोयी सुविधांसाठी एम-पीसीएमसी हे अॅप तयार केले आहे. सध्या अँड्रॉईड बेस मोबाइलवर हे अॅप्लिकेशन प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करण्यात आले आहे. सुरुवातीला रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी या अॅपवर घेतल्या जाणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यास या खड्ड्यांची माहिती तत्काळ महापालिकेला कळविणे शक्य व्हावे, यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. नागरिकांनी या अॅपद्वारे खड्ड्याचे छायाचित्र काढावे.(प्रतिनिधी)