पिंपरीत बेकायदा गुटखा जप्त

By Admin | Updated: March 15, 2016 03:51 IST2016-03-15T03:51:25+5:302016-03-15T03:51:25+5:30

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली. सुमारे ३८ हजार रुपयांचा गुटख्याचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला आहे.

In possession of illegal gutka | पिंपरीत बेकायदा गुटखा जप्त

पिंपरीत बेकायदा गुटखा जप्त

चिंचवड : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने बेकायदा गुटखाविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली. सुमारे ३८ हजार रुपयांचा गुटख्याचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला आहे.
गुटखा विक्रीला कायद्याने बंदी असताना, पिंपरीत राजरोसपणे गुटखाविक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांच्या पथकाने संत तुकारामनगर येथील धनश्री किराणा दुकानावर छापा टाकला. या छाप्यात बेकायदा साठा केलेल्या गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. या दुकानातून होलसेल दरात गुटख्याची विक्री केली जात होती. आजूबाजूला छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांच्या व्यावसायावर त्याचा परिणाम होत होता. त्यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा, तसेच त्यांच्यातील मतभेदामुळे अन्न व औषध प्रशासनापर्यंत बेकायदा गुटखा साठा आणि विक्रीबद्दलची माहिती पोहोचली.(प्रतिनिधी)

Web Title: In possession of illegal gutka