पावणेआठ लाखांच्या दागिन्यांची बसमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:44 IST2018-03-19T00:44:46+5:302018-03-19T00:44:46+5:30
पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून तब्बल ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

पावणेआठ लाखांच्या दागिन्यांची बसमध्ये चोरी
पिंपरी : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाच्या पिशवीतून तब्बल ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान निगडी ते हडपसर
प्रवासात घडली. या प्रकरणी दिगंबर शेवाळे (वय ७२, शेवाळवाडी, हडपसर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळे गुरुवारी सायंकाळी निगडीतून पीएमपी बसने हडपसरला जात होते. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचे दागिने होते. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शेवाळे यांची नजर चुकवून पिशवीतील ७ लाख ८४ हजार रुपये किमतीचे दागिने पळविले. निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे अधिक तपास करीत आहेत.