शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘पॉस’ मशिनने धान्यवाटपाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:53 AM

रेशनिंग दुकान : शहरात १८२ मशिनद्वारे वितरकांना पुरवठा

पिंपरी : निगडीतील परिमंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘अ’ आणि ‘ज’ या दोन विभागात १८२ ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्यवाटप केले जाते़ यामुळे सर्व धान्यवाटपाचे ‘रेकॉर्ड’ राहत असून, त्यानुसार दुकानदारांना मोजकेच धान्य पुरविले जात आहे. ‘अ’ विभागात ९८ मशीन असून, ३० हजार ८६२ शिधापत्रिकाधारक आहेत. तर ‘ज’ विभागात ८४ मशीन असून, २९ हजार ३०७ शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनिंग दुकानांमधून यापूर्वी शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. आता ‘पॉस’ मशिनद्वारे वाटप होत आहे. यासाठी दुकानदारांना पॉस मशीन देण्यात आले आहे.

या मशीनमुळे धान्य वाटपातील काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. दरम्यान, पॉस मशीनसाठी प्रत्येक दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहेत. त्यानुसार कार्यालयाकडून दुकानदारांना धान्य पुरविले जात आहे. शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती, युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती यामध्ये आहे. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता त्यास आळा बसत आहे. जितके धान्य दिले, तेवढ्या रकमेची स्लिप बाहेर येणार आहे. शिधापत्रिकाधारकांची सर्व माहिती पॉस मशीनमध्ये संकलित आहे. दुकानदाराने धान्य दिल्यानंतर लगेचच त्याची पावतीदेखील मिळत आहे. या शिधापत्रिकेतील माहितीचेदेखील संगणकीकरण करण्यात आले आहे.पूर्वी रास्त भाव धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर धान्यवाटप केले जात होते. यामुळे अनेकदा इतर व्यक्तीने धान्य नेण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता पॉस मशीनवरील माहिती जुळली, तरच धान्य दिले जाते.पारदर्शक, पेपरलेस कारभाराने भ्रष्टाचाराला आळाशिधापत्रिकाधारकांच्या माहितीचे संगणकीकरण झाल्याने नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होत आहे. तसेच पेपरलेस कारभार होण्यासही हातभार लागत आहे. आॅनलाइन कामकाज करण्यासाठी या माहितीचे संगणकीकरण फायदेशीर ठरणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड