शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Positive Story: पिंपरीत गृहविलगीकरणात उपचार घेऊन १ लाख ६६ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 13:50 IST

सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत जवळपास ८० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात

ठळक मुद्देशहरात आता पर्यँत २ लाख १५ हजार ३९३ कोरोना रुग्णांची नोंद, तर १ लाख ९० हजार ४२१ रुग्ण कोरोनातून बरे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यँत २ लाख १५ हजार ३९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १लाख ९० हजार ४२१ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ६६ हजार ६७९ जण हे गृहविलगीकरणात उपचार घेऊन बरे झाले आहेत.  अशी माहिती महापालिकेच्या वॉर रूमने दिली. 

ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. इतर कोणताही आजार नाही. अशा रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जाते. सद्यस्थितीत शहरात १३ हजार ९८४ रुग्ण हे  त्यामध्ये उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत जवळपास ८० टक्के रुग्णांनी हा पर्याय निवडला आहे. सुरुवातीच्या काळात या पर्यायाने उपचार घेण्याबाबत नागरिकांमध्ये भीती होती. परंतु आता नागरिक स्वतःहून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णांना जरी सौम्य लक्षणे असली तरी त्यांच्या पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवी यासाठी महापालिकेने कोविड कॉल सेंटर सुरू केले आहे.  

रुग्ण अति गंभीर होण्याआधी उपचार व्हावेत. रुग्णाच्या  घरातील इतर व्यक्तींना वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे. रुग्णांना वैद्यकीय आणि मानसिक आधार देणे यासाठी हे कॉल सेंटर सुरू केले आहे.  या माध्यमातून रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. यामध्ये कोणती लक्षणे आहेत. ताप, सर्दी, खोकला याची माहिती घेतली जाते. रुग्णाला काही शंका असल्यास फोन डॉक्टरांना जोडून दिला  जातो.  यासाठी दहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून दररोज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरला दिली जाते.   

गृहविलगीकरणात असणाऱ्यांनी ही काळजी घ्यावी 

- घरी व्यवस्था असेल तरच पर्याय स्वीकारावा.  - कोणाच्याही संपर्कात येवू नका. - रोज नियमितपणे ऑक्सिजन पातळी तपासा आणि  नोंद करून ठेवा.  - मास्क, टीशु पेपर, वापरलेले साहित्य वेगळ्या बॅगमध्ये ठेवा इतरत्र फेकू नका.  - सहा मिनिटांची वॉक टेस्ट करा. - उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा.  - कोणताही त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हा. २ मे पर्यँतची आकडेवारी 

आज पर्यँतचे एकूण रुग्ण: २ लाख १५ हजार ३९३ बरे झालेले: १ लाख ९० हजार ४२१ गृहविलगीकरणात बरे झालेले: १ लाख ६६ हजार ६७९ मृत्यू : ३ हजार ३३ हद्दी बाहेरील मृत्यू : १ हजार ५२१ सध्या सक्रिय रुग्ण : २१ हजार ९३८ रुग्णालयात आणि सीसीसी सेंटर मध्ये उपचार घेत असलेले: ७ हजार ९५४गृहविलगीकरणात असलेले: १३ हजार ९८४

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल