पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान
By Admin | Updated: April 17, 2016 02:55 IST2016-04-17T02:55:29+5:302016-04-17T02:55:29+5:30
विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक ८ ह्यअ’(विद्यानगर) ही जागा रिक्त

पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान
चिंचवड : विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
महापालिकेची प्रभाग क्रमांक ८ ह्यअ’(विद्यानगर) ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रससह काँगे्रस, भाजपा, शिवसेना, भारिपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराचा समारोप झाला.
रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक सहायक केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक शिपाई नेमण्यात आले आहेत. या प्रभागात एकूण १० हजार २०८ मतदार असून, मतदानावेळी ओखळपत्र असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे.
मतदान यंत्रे आणि इतर साहित्य शनिवारी दुपारीच केंद्रांवर पोहोचविण्यात आले. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदान केंद्रापासून दोनशे मीटर अंतराच्या परिसरात केवळ मतदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यासह या परिसरात वाहनांना बंदी आहे. (वार्ताहर)