शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत रेशनिंगवरील गरीबांच्या तोंडचा घास पळवताहेत राजकारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:00 IST

राजकीय नेते दबाव टाकून सामान्यांचा शिधा गायब करून चमकोगिरी केली सुरू

ठळक मुद्देसर्वसामान्यांना, हातावरचे पोट  असणाºयांना दोन वेळेचे जेवणाची भ्रांतशहराची लोकसंख्या २३ लाखांवर गेली आहे. तर मिळकतींची संख्या साडेचार लाख

विश्वास मोरे-पिंंपरी : कोरोनाचा विळखा वाढत असताना गरीबांपर्यंत शिधा पोहोचत नसल्याचे चित्र असून आधार लिंक केलेल्या शिधापत्रिकांनाच सध्या शिधा पोहोचला जात आहेत. लिंक न झालेल्या शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते दबाव टाकून सामान्यांचा शिधा गायब करून चमकोगिरी सुरू केली आहे. त्यामुळे रेशनचे वितरण करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. गरीबांच्या तोंडचा घास पळविला जात आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे औद्योगिकनगरीचे चाक थंड झाले असून जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वसामान्यांना, हातावरचे पोट  असणाऱ्यांना दोन वेळेचे जेवणाची भ्रांत होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असे नागरिक वास्तव्यास आहेत. शहराची लोकसंख्या २३ लाखांवर गेली आहे. तर मिळकतींची संख्या साडेचार लाख आहे.अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या वतीने अ (चिंचवड विधानसभा), ब, ज (पिंपरी विधानसभा) या दोन परिमंडळ विभागाचे कामकाज सध्या एकाच कार्यालयाकडून सुरू आहे. स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक काळापासून आहे. अ विभागात ९७ दुकानदार असून कार्डसंख्या २९,५२४ तर, ज विभागात ८३ दुकानदार असून कार्डसंख्या २८,३१६ आहे.शहरासाठी स्वतंत्र अन्नधान्य वितरण कार्यालय आहे. तसेच पिवळ्या, पांढºया आणि केशरी अशा शिधापत्रिकाधारक आहेत. तसेच शहरातील विविध भागात  रेशनची दुकाने आहेत. विविध उद्योगांत कामधंद्यासाठी देशातील आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र, वाढत्या नागरिकीकरणात रेशनधारकांची दुकाने कमी आहेत. त्यापैकी  शासकीय प्रणालीशी शिधापत्रिका लिंक होण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच या शहरात पिवळ्या, पांढºया आणि केशरी अशा  शिधापत्रिका असूनही अनेकांना शिधा मिळत नाही.प्रशासन शासकीय आदेशाच्या प्रतीक्षेत*अन्नधान्य वितरण विभागाच्यावतीने रेशन दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना शिधा पुरविण्यात येतो. कार्डांच्या संख्येनुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अन्नधान्य पुरवठा होत असतो. त्यामुळे काडार्नुसार अन्नधान्य पुरवठा पुरेसा असल्याचे अधिकाºयांचे मत आहे. मात्र, सरसकट शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याचा निर्णय न झाल्याने कार्ड असूनही केवळ ते लिंक न झाल्याने नागरिकांना शिधा मिळत नाही. अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

*दबाव टाकून शिधा गायबकाडार्नुसार शंभर टक्के शिधा नागरिक नेत नाहीत. तसेच शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे आधारशी रेशन कार्ड लिंक असूनही केवळ कार्डधारक उपस्थित नसल्याने शिधा पडून आहे. याचाच फायदा राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक यांनी घेतला आहे. आपापल्या भागातील रेशन दुकानदारांकडून पोत्याने माल घेऊन जात आहेत. तसेच मोठमोठ्या नेत्यांची नावे सांगून दुकानदारांवर दबाव टाकला आहे. भीतीने दुकानदार तक्रार करायला तयार नाहीत. मिळालेला शिधा स्वत:च्या नावाने चमकोगिरी केली जात आहे. दुकानदार लूट करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे..............काही काळ्या यादीत गेल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे त्यांचे रेशन कार्डला आधार कार्ड लिंंक झालेले नाही. या रेशन कार्डधारकांना पूर्वी धान्य मिळत होते; परंतु आॅनलाइन न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही, अशा नागरिकांची पिंंपरी-चिंंचवड शहर आणि प्रभागांमध्ये संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांचे रोजगार बंद झाल्यामुळे तसेच दररोजची कमाई होत नसल्यामुळे  हाल होत आहेत. सर्व कार्डधारकांना धान्य द्यावे.-राहुल कलाटे,गटनेता शिवसेना

सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनमुळे घर सोडू शकत नाहीत व घरी खायला काही नाही, अशी अवस्था झालेली आहे.   हेल्पलाइनवर  गोरगरीब,  झोपडपट्टीतील नागरिक  संपर्क साधू शकणार नाही, अथवा साधता येणार नाही. त्यामुळे या लोकांची उपासमार होणार आहे.सरसकट धान्य द्यावे. -नाना काटे, विरोधीपक्षनेते, महापालिका  

पिंपरी-चिंचवड ही कामगार, कष्टकºयांची नगरी आहे. मात्र, त्याठिकाणी हातावरचे पोट असणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. सध्या रेशन हे ज्या कार्डधारकांचे आधार लिंक झाले आहे, त्यांनाच रेशन मिळत आहे. मात्र, इतर लोकांना शिधा मिळत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाच्या कालखंडात कार्ड असणाºया सर्वांना रेशन द्यावे. महिनाभर लॉकडाऊन असल्याने उपासमार होण्याची वेळ आली आहे.- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्टÑ कामगार पंचायत

आधार लिंक असलेल्या कार्डधारकांना सुरळीतपणे शिधा पुरवठा सुरू आहे. आधार लिंक नसलेल्या शिधा पत्रिकाधारकांना शिधा देण्यासंदर्भात अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लिंक असलेल्या कार्डधारकांना शिधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.- दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी,अन्न- धान्य वितरण विभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारण