शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पोलीसही होणार आता ‘एक दिवसाचे सीएम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:26 IST

गुन्हेगारी रोखण्यासाठी राबविणार अभिनव प्रयोग

पिंपरी : अभिनेता अनिल कपूरच्या ‘नायक’ या चित्रपटातील ‘एक दिन का सीएम’ या संकल्पनेवर आधारित पोलिसांनाही ‘एक दिवसाचा सीएम’ होण्याची अभिनव संधी उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत हा प्रयोग करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ही अभिनव संकल्पना साकारण्याचे नियोजन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखालील पथकाला कोणत्याही एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसासाठी गुन्हेगारी रोखण्याची धडक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक दिवसाचा ‘नायक’ ठरणार आहे.स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रयोग आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक दिन का सीएम’ हा प्रयोग पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आयुक्तालया अंतर्गत असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याचा यात समावेश आहे. यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकास एका दिवसासाठी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अवैध धंदे, सराईत गुन्हेगारांवरील कारवाई अशी कारवाई करून मिळालेल्या संधीतून कतृत्वाची चमक दाखवता येणार आहे. त्यांच्या नेतृत्वातील पथक एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभर गुन्हेगारांवर कारवाई करू शकणार आहे. असे पथक नियुक्त करताना गुप्तता पाळण्यात येणार आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाई करावयाच्या दिवशीच याबाबतची अचानक सूचना दिली जाणार आहे. त्या दिवसासाठी त्यांना इतर कामकाजातून मोकळीक दिली जाणार आहे. संबंधित पथकाने कारवाईसाठी कोणतेही एक पोलीस ठाण्याची हद्द निश्चित करायची आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार अड्डे, गुटखा विक्री, दारूची अवैध विक्री, अवैध धंदे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक आदींवर कारवाई करता येणार आहे.पोलिसांना रहावे लागणार ‘अलर्ट’पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही दिवशी असा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांतील पोलिसांना रोजच सतर्क रहावे लागणार आहे. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम काही अंशी का होईना, गुन्हेगारी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार आहे. पथक अचानक भेट देऊन कारवाई करण्याची शक्यता असल्याने पोलिसांना खबरदारी घेणे भाग पडणार आहे.‘रिस्पॉन्स टीम’ला सतर्क ठेवण्याचा प्रयत्ननागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून ‘रिस्पॉन्स टीम’ स्थापन करण्यात आली. मात्र या ‘टीम’कडून काही वेळेस ‘स्लो रिस्पॉन्स’ मिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सतर्क ठेवण्यासाठी आयुक्त पद्मनाभन प्रयत्नशील आहेत. अशा अभिनव प्रयोगाने गुन्हेगारी कमी होऊन प्रत्येक ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सतत सतर्क राहण्यास मदत होणार आहे.बेशिस्तीला बसणार लगामवेळीच उपाययोजना न केल्यास गुन्हेगारीत वाढ होते. काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि बेशिस्तपणा याला काहीअंशी कारणीभूत असतो. अशा बेशिस्तीला या अभिनव प्रयोगामुळे लगाम घालण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील काम सुरळीत होईल आणि तक्रारदारांना त्वरित मदत मिळेल तसेच गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्री