शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरचा पोलिसांनी केला ‘उपचार’

By नारायण बडगुजर | Updated: June 4, 2025 19:50 IST

- वीस किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात केली अटक

पिंपरी : किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कंपाउडरला पोलिसांनी अटक केली. २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात त्याला शिताफिने पकडले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.यशवंत दिगंबर सूर्यवंशी (३२, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे चाकण येथे किराणा दुकान आहे. फिर्यादी महिला ३ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानात एकटी असताना संशयित दुकानामध्ये आला. चाॅकलेट आणि बडीशेप खरेदी करण्याचा त्याने बहाणा केला. महिलेच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्याने महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावले. त्यानंतर दुचाकीवरून तो चाकणच्या दिशेने पसार झाला. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयिताचा माग काढला. त्यासाठी २० किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. खेड तालुक्यातील बोरदरा गावाच्या हद्दीतील एका खासगी कंपनीजवळ संशयिताची दुचाकी आढळून आली. दुचाकीला मागची नंबरप्लेट नव्हती. तसेच पुढच्या नंबरप्लेटवर चिखल लावला होता. त्यामुळे दुचाकीचा नंबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत नव्हता.पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकीमालकाचा शोध घेतला असता एका रुग्णालयाशी संबंधित डाॅक्टरचे नाव पुढे आले. डाॅक्टरकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करणारा कर्मचारी संबंधित दुचाकी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कर्मचारी खासगी कंपनीमध्ये गेला असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खासगी कंपनीतून संशयित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्तसंशयिताकडून दुचाकी व २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एक लाख ८० हजार रुपये किमीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सहा तासात या गुन्ह्याची उकल केल्याने युनिट तीनच्या पोलिसांचे कौतुक होत आहे. सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याArrestअटक