शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"काढ रे हत्यार याचा मर्डर करून टाकू..." डंपर अडवल्याने खून करण्याची पोलिसालाच धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:42 IST

"आमची गाडी अडवतो का, तुझा मर्डर करतो..."

पिंपरी : डंपर अडवला म्हणून दोघांनी भर रस्त्यात पोलिस अंमलदाराला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत पोलिसाचा खून करण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी (दि. २७) सायंकाळी सात वाजता क्रोमा टी जंक्शन, हिंजवडी फेज दोन येथे घडला.

अमित साखरे, प्रथमेश हांडे (दोघे रा. हिंजवडी), तसेच हायवा डंपर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार सोमनाथ दिवटे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस अंमलदार दिवटे हे हिंजवडी फेज दोन येथे कर्तव्यावर असताना आलेल्या हायवा डंपरला त्यांनी थांबवण्याचा इशारा केला. त्या कारणावरून डंपरचा मालक अमित आणि त्याचा मित्र प्रथमेश यांनी दिवटे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अमित याने शिवीगाळ करत, आमची गाडी अडवतो का, तुझा मर्डर करतो. मी हिंजवडीचा भाई अमित साखरे आहे. काढ रे हत्यार याचा मर्डर करून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस