शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

दोन होमगार्डसह पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 2:15 AM

भीमाशंकरजवळील आदिवासी पाड्यातून नोकरीच्या निमित्ताने चाकणला आलेल्या एका तरुणीला तिच्या सहकाऱ्याबरोबर दुचाकीवरून जात असताना होमगार्डने अडविले.

पिंपरी : भीमाशंकरजवळील आदिवासी पाड्यातून नोकरीच्या निमित्ताने चाकणला आलेल्या एका तरुणीला तिच्या सहकाऱ्याबरोबर दुचाकीवरून जात असताना होमगार्डने अडविले. दोन होमगार्ड आणि एक कॉन्स्टेबल एकत्र आले. त्यांनी दुचाकी घेऊन थांबलेल्या तरुणाकडे दुचाकीची कागदपत्रे मागितली. तसेच पैशांची मागणी केली.पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांचे आधार कार्ड काढून घेतले. तरुणीच्या मोबाइलमध्ये होमगार्डनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले. फोन केल्यानंतर प्रतिसाद दे अशी तंबी देऊन दुसºया दिवशी एक होमगार्ड तिला घेऊन लॉजवर गेला. प्रसंगावधान दाखवून तिने सहकाºयाशी संपर्क साधला. तो तातडीने मदतीला धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. तरुणीने याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाईझाली आहे.पोलीस आयुक्तालय कार्यालयाने चाकण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजय भोसले, होमगार्ड सचिन वाघोले, सागर मांडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. पैसे उकळण्यासाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच विनयभंगाचा गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिघांवर निलंबनाची कारवाई केली.चाकण-सहारा सिटी रस्त्यालगत तरुण आणि तरुणी रस्त्याच्या बाजूला दुचाकी घेऊन थांबले असता एक कॉन्स्टेबल, दोन होमगार्ड तेथे आले. तरुण-तरुणीला दमदाटी करून पैसे मागू लागले. पाच हजार रुपये द्या, सोडून देतो, असे म्हणत त्यांनी दोघांचे आधार कार्ड काढून घेतले. काहीही चूक केलेली नसताना पैसे कशासाठी द्यायचे, असा मनात विचार आला. खरे तर त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नव्हती. या रकमेची काही दिवसांत जुळवाजुळव करणेही शक्य नव्हते. होमगार्डने पैसे आणून दे, आधार कार्ड, ओळखपत्र घेऊन जा, अशी तंबी दिली. तरुणीचा मोबाइल मागून घेतला. त्यात त्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले.दुसºया दिवशी तरुणी राहत असलेल्या पत्त्यावर ते गेले. तेथे जाऊन मोबाइलवर संपर्क साधला. तू खाली येतेस का, आम्ही वरती येऊ असे धमकावले. तरुणी खाली आल्यानंतर होमगार्डने तिला तोंडाला स्कार्फ बांधण्यास सांगितले. स्वत:नेहीस्कार्फ बांधला. काही अंतर पुढे गेल्यावर हॉटेलात जाऊन तिलानाष्टा दिला. स्वत:ही नाष्टा केला. त्यानंतर दुचाकीवरून एका लॉजवर नेले. तेथे तू वर खोलीत जा, मी थोड्या वेळात येतो, असे सांगून होमगार्ड खाली थांबला.>मित्राने मदत केल्याने वाचला जीवलॉजवर जाईपर्यंत होमगार्डने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. होमगार्डने लॉजवर जाण्यास सांगितल्यानंतर तरुणीला काही तरी गडबड असल्याचे लक्षात आले. तिने सहकाºयाशी संपर्क साधला. त्याला बोलावून घेतले. तिचा मित्र तातडीने तेथे आला. काही कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्यांनी या प्रकाराबद्दल दाद मागण्याचा निर्णय घेतला. तरुणीला घेऊन ते पोलीस आयुक्त कार्यालयात आले. एक कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने निलंबन करण्यात आले.