शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:42 IST

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे.बदली झालेल्यांमध्ये भानुदास जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांची बदली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ येथे करण्यात आली आहे.  सुधाकर काटे यांची पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे अशी बदली केली आहे. अमरनाथ रामचंद्र वाघमोडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा येथे बदली केली आहे. राजेंद्र पांडूरंग कुंटे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न येथे बदली करण्यात आली आहे.  भीमराव एन. शिंगाडे यांची पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार अशी बदली केली आहे. विवेक व्ही. मुगळीकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल अशी बदली केली आहे.  श्रीराम बळीराम पौळ  यांची पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार अशी बदली करण्यात आली आहे. शंकर वामनराव अवताडे यांची पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड येथे बदली केली आहे. सतिश पवार यांची पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी अशी बदली करण्यात आली आहे. आर.पी. चौधर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न अशी बदली झाली आहे.  उमेश औदुंबर तावसकर पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष अशी बदली झाली आहे. सतिश विठ्ठलराव नांदुरकर यांची पोलीस निरीक्षक (गुन्हे )भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार असा त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. बदली झालेल्यांमध्ये एकुण १३ सहायक पोलीस निरीक्षक ,५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीपुर्वी असे बदल नेहमीच केले जातात. त्यानुसार यावेळीही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliceपोलिसTransferबदली