शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शहर दलातील कर्तृत्ववान पोलिसांचा होणार सन्मान; विविध पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 21:11 IST

पोलीस उपायुक्तांच्या हस्ते ३८ पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे.

पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विविध पदक, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात हा सोहळा होणार आहे. पोलीस उपायुक्तांच्या हस्ते ३८ पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे. 

पोलीस आयुक्तालयातील सहा पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. यात बिनतारी संदेश विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार अशोक दुधवणे, चाकण पोलीस ठाण्याचे हवालदार राजू जाधव, तांत्रिक विश्लेषण विभागाचे हवालदार नागेश माळी, गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांचा समावेश आहे. गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट  सन्मानचिन्ह चार जणांना प्रदान करण्यात येईल. यात म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, मुख्यालयाचे उपनिरीक्षक विजय जगदाळे, आळंदी पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मोरे, आळंदीचे पोलीस कर्मचारी राजकुमार हनमंते यांचा समावेश आहे. 

विशेष सेवा पदक सात जणांना प्रदान करण्यात येणार आहे. यात पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, उपनिरीक्षक गंगाधर ढगे, नागनाथ सूर्यवंशी, अहमद मुल्ला, समीर दाभाडे, गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी योगेश्वर कोळेकर, युनिट पाचचे कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर यांना सन्मानित केले जाणार आहे. 

पुणे येथे ७ ते १३ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा झाली. यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले. या कर्मचाऱ्यांना देखील यावेळी सन्मानित केले जाणार आहे. यात विशेष शाखेच्या पोलीस नाईक रश्मी धावडे, वाहतूक शाखेच्या परवीन पठाण, दिघी पोलीस ठाण्याच्या पुनम लांडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल साळुंके, सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुहास डंगारे, देहूरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहसीन अत्तार, विशेष शाखेच्या कर्मचारी राजश्री रावत, सायबर सेलच्या कर्मचारी स्मिता पाटील, युनिट पाचचे पोलीस नाइक अली शेख, मुख्यालयातील पोलीस नाइक शरीफ मुलाणी, युगंधरा अवसरमल यांचा सन्मान होणार आहे.      

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस