पिंपरी : रेकॉर्डवरील व फरार गुन्हेगारांचा शोध, जमाव करून थांबणा-या टोळ्या, वेगात गाडी चालवणा-यांची तपासणी, छेडछाड करणाऱ्यांची धरपकड याप्रकारे ही मोहीम गुरूवारी रात्री पिंपरी पोलिसांकडून राबविण्यात आली. या मोहिमेत परिमंडळ तीनमधील पन्नास अधिकारी आणि चारशे पोलीस कर्मचारी सहभागी झाले.पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन आॅलआऊट राबविण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. ही मोहीम गुरुवारी रात्री दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत राबविण्यात आली. शिंदे म्हणाले, रेकॉर्डवरील आणि फरार गुन्हेगार सापडल्यास त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच मोकळ्या जागेत विनाकारण थांबणारी ,छेड काढणारी आणि वेगात गाडी चालवणाऱ्या मुलांना तपासून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पिंपरीत गुरुवारी रात्री पोलिसांचे मिशन आॅलआऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:33 IST
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन आॅलआऊट राबविण्यात आले.
पिंपरीत गुरुवारी रात्री पोलिसांचे मिशन आॅलआऊट
ठळक मुद्देरेकॉर्डवरील आणि फरार गुन्हेगार सापडल्यास त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई