शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:58 IST

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळीनेवून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणा-या दोघांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देअत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू दुस-या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारणागृहात रवानगी

पुणे : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळीनेवून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणा-या दोघांना हिंजवडीपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून दुस-याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी दिले आहेत.     अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गणेश शालिक निकम (वय २२, रा. संत तुकाराम सहकारी, कासारसाई, मुळशी, मुळ रा. आंचलगाव, जळगाव) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीची बाल सुधारणागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेतील दोन्ही मुली हा १२ वर्षांच्या आहेत. त्यातील एका पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.              रविवारच्या दुपारी तीन ते चार दरम्यान हिंजवडीजवळ असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील जंगलात हा प्रकार घडला. पीडित मुली या मंदिराबाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मंदिराजवळ राहत असलेल्या आरोपींनी पीडित मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंदिरामागे असलेल्या जंगलात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर पीडित मुलींना जीवे मारण्याचीही धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी ही घटना घरच्यांना सांगितला नव्हती. मात्र, एका मुलीला त्रास होत असल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली आणि त्याबाबत तिने मुलींना विचारल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.   आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, आरोपींना यापूर्वी पीडित मुलींवर अत्याचार केले आहेत का?, आरोपींचे कोणी साथीदार आहेत का? तसेच आरोपींनी या प्रकरणातील मुलींव्यतिरिक्त आणखी कोणत्या मुलींवर अत्याचार केला आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड. मकरंद औरंगाबादकर यांनी केली होती. ती मागणी मान्य करत न्यायालयाने निकम याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारणागृहात रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करत आहेत. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसCourtन्यायालय