शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीसाठी मोटार थांबवल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:30 IST

पोलीस व्हॅनचीही काच फोडली

ठळक मुद्देमोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पोलिसांना मारहाण होण्याचे प्रकार सुरूच आहेत. चेक पोस्टवर पोलिसांनी मोटार थांबवून चौकशी करत असताना चालकाने दिघी पोलीस ठाण्यातील हवालदारासह शिपायाला मारहाण केली. एवढेच नाही तर आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. हा प्रकार रविवारी  सायंकाळी सव्वापाच वाजता बोपखेल फाटा, गणेशनगर येथे घडला.दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी फिर्याद दिली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी - चिंचवड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे खबरदारी घेत आहे. पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा नाक्यावर रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. आरोपी महेंद्र त्याच्या मोटारीतून जात असताना कामठे यांनी त्यांची मोटार तपासणीसाठी थांबवली. मात्र, मोटार थांबवल्याचा राग आल्याने महेंद्र याने  कामठे यांच्या कानाखाली वाजविली. पोलीस शिपाई जाधव यांना दगड फेकून मारला. तसेच पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. पोलीसांना मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आरोपी महेंद्र याला पोलिसांच्या व्हॅनमधून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना महेंद्र याने व्हॅनच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. महेंद्र याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस