शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारलेल्या आरोपीकडे येरवडा कारागृहात मोबाईल

By विवेक भुसे | Updated: May 21, 2023 12:05 IST

कारागृहात बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल आणि त्यात बॅटरी व सिमकार्डही होते

पुणे : खून प्रकरणातील फरारींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयितांनी गोळीबार केला. तेव्हा पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींवर झाड फेकून मारले होते. त्यात पकडलेल्या आरोपीकडे येरवडा कारागृहात मोबाईल आढळून आला आहे. त्यामुळे कारागृहातील मोबाईल जॅमरवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. अश्विन आनंदराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या न्यायालयीन कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अमोल जाधव (वय ३७, रा. लोहगाव) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक एक, बॅरेक क्रमांक एकमध्ये शुक्रवारी रात्री दोन वाजता घडला. 

याबाबतची माहिती अशी, पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा गोळीबार करुन योगेश जगताप यांचा खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी हे चाकण परिसरातील कोये गावी असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. पोलिस आल्याचे समजताच आरोपींनी गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील पडलेले झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकले होते. त्यावेळी तिघा आरोपींना पकडण्यात आले होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील बॅरेक क्रमांक एक मधील खिडकी क्रमांक २ मध्ये गस्त घालणार्‍या सुरक्षा रक्षकांना मध्यरात्री २ वाजता एक मोबाईल आढळून आला. त्यात बॅटरी व सिमकार्डही आढळून आले. कारागृहात बंदी असतानाही हा मोबाईल अश्विन चव्हाण याने आणला असल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMobileमोबाइल