शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपायुक्त ‘कोंडी’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 00:54 IST

आढावा बैठकीवेळी घडला प्रकार : हिंजवडीत स्वत: केले वाहतूक नियमन

वाकड : हिंजवडी आयटी नगरीतील रस्ते आणि मुख्य चौकांची पाहणी करून वाहतूककोंडीबाबत आढावा घेत असताना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव वाहतूककोंडीत अडकले होते. ही कोंडी सोडविण्यासाठी उपायुक्त पाटील आणि सहायक आयुक्त जाधव यांनी स्वत: दीड तास वाहतूक नियमन केले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

आयटीनगरी हिंजवडीची वाहतूक समस्या जटिल आहे. चार दिवस झालेल्या संततधार पावसाने वाहनांचा खोळंबा झाला. परिणामी वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव शुक्रवारी सायंकाळी हिंजवडीत रस्ते आणि मुख्य चौकांची पाहणी करण्यासाठी आले होते. या वेळी वाहतूक समस्यांचा आढावाही त्यांच्याकडून घेण्यात येणार होता. मात्र सायंकाळी गर्दीची वेळ असल्याने पाटील आणि जाधव वाहतूककोंडीत अडकले. त्यामुळे त्यांनी स्वत: दीड तास वाहतूक नियमन केले.हिंजवडी आयटीनगरी वाहतूक समस्येच्या गर्तेत आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होेते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यानंतर येथील पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभनदेखील वाहतूककोंडीत अडकले होते. या सर्वांची दाखल घेत उपायुक्त पाटील यांनी हिंजवडीतील प्रमुख चौकांची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेतला. सकाळी व सायंकाळी सिग्नलच्या वेळा बदलणे, सेवा रस्त्यावरील वाहतूक एकेरी करणे, सायंकाळच्या वेळी वाहनांना नो एंट्री करणे आदी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाहतूक नियंत्रण कक्ष१नवीन पोलीस आयुक्तालयांतर्गत हिंजवडीसाठी वाकड येथे वाहतूक नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे येथील वाहतूककोंडीतून काही प्रमाणात सुटका मिळणार असल्याची आशा सर्वांना आहे. या कक्षासाठीही या वेळी पाहणी करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक विभागाचे प्रमुख किशोर म्हसवडे यांच्यासह वाहतूक पोलीस व हिंजवडी पोलीस कर्मचारी वाहतूक नियमन करीत होते.अधिकाºयांचा दे धक्का२पोलीस उपायुक्त नम्रता पाटील भूमकर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्या वेळी एक टँकर अचानक भूमकर चौकातील भुयारी मार्गात बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. टँकर त्वरित बाजूला घेणे आवश्यक होते. त्यामुळे वाहतूक नियमन करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनीच या टँकरला धक्का देत तो ढकलला. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक विभागाचे प्रमुख किशोर म्हसवडे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी धक्का देऊन टँकर बाजूला काढला.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड