शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

बापरे..! रील करत मध्यरात्री पोलिस स्टेशनसमोरच पोलिसांनी केलं वाढदिवसाच सेलिब्रेशन

By विश्वास मोरे | Updated: March 7, 2025 14:36 IST

सांगवी पोलिस स्टेशनसमोरच पोलिसाचा वाढदिवस : चार पोलीस निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली  

पिंपरी :पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सांगवी पोलीस ठाण्यासमोरच रात्री बाराला पोलिस प्रवीण पाटील यांचा 'बर्थ डे' सेलिब्रेशन करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवस साजरा करून "हरगीज झुकेगा नही साला' या पुष्पा चित्रपटातील डायलॉगवरील रील सोशल मिडीयावर व्हायरल करणे महागात पडले आहे. याप्रकरणी चार पोलिसांना निलंबीत केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रात्री उशीरा राजकीय नेते, कार्यकर्ते आणि गुन्हेगार वाढदिवस साजरे केले जात आहेत, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच सार्वजनिक शांततेचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करीत असल्याचे उघड झाले आहे. बुधवार (५ मार्च ) संपताच रात्री १२ वाजता गुरुवार सुरू होण्याच्यावेळी सांगवीतील पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण पाटील यांची मित्र मंडळी जमा झाली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला 'दादा' लिहलेला दुमजली केक कापण्यात आला. त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही केला आहे. पुष्पा चित्रपटातील "अब दिख रहा हूं ना मै जैसा दिखाना चाहिए वैसा. हरगीज झुकेगा नही साला ... " या डायलॉगवर रील केली आहे.    यांच्यावर केली कारवाई 

करण्यात आले. मात्र, व्हिडीओ सर्वत्र पसरल्या नंतर सर्व सामान्य नागरिकांकडून टीका होत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. बदली केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPoliceपोलिस