पोलिसांकडूनच नियम भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:16 IST2017-08-02T03:16:27+5:302017-08-02T03:16:27+5:30
शहरात अनेक ठिकाणी प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केलेले असतात. हे कर्मचारी वाहनचालकाकडून नियम पाळण्याची अपेक्षा करतात

पोलिसांकडूनच नियम भंग
चिंचवड : शहरात अनेक ठिकाणी प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केलेले असतात. हे कर्मचारी वाहनचालकाकडून नियम पाळण्याची अपेक्षा करतात; मात्र शहरातील काही वाहतूक कर्मचारी स्वत:ची वाहने फुटपाथवर, नो पार्किंगमध्ये पार्क करणे, रस्त्याच्या कॉर्नरवर, झेब्रा क्रॉसिंगवर उभी करतात. त्यामुळे या वाहतूक कर्मचाºयांना नियम लागू होत नाहीत का? आणि त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे़ तसेच वाहतूक अधिकाºयांनी प्रथम कर्मचारीवर्गाला नियम शिकवावेत आणि मग दंड वसूल करावा, अशी मागणी ही नागरिकांकडून केली जात आहे.
(बी. एस. पाटील)