शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
2
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
3
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
4
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
5
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
6
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
7
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
8
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
9
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
10
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
11
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
12
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
13
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
14
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
15
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
16
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
17
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
18
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
19
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
20
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Police Bharti: पोलीस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 10:49 IST

लेखी परीक्षेचे परीपूर्ण नियोजन होऊ न शकल्याने ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी येणार आहेत (police bharti)

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होतीएक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले आहेत

पिंपरी : पोलीस भरतीसाठी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून १७ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानंतर २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र एक लाख ८९ हजार ७३२ परीक्षार्थी असल्याने नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही लेखी परीक्षा तुलसी विवाहाच्या मुहूर्तावर अर्थात शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया रखडली. दरम्यान, राज्यातील इतर शहर व ग्रामीण पोलीस दलांकडून परीक्षा घेण्यात आली. मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची लेखी परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. तसेच परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी एका त्रयस्थ खासगी कंपनीकडे देण्यात आली. मात्र परीक्षार्थी पावणे दोन लाखांपेक्षा जास्त असल्याने परीपूर्ण नियोजन करणे शक्य झाल्याचे दिसून येत नाही.

लेखी परीक्षेसाठी तिस-यांदा ‘तारीख’-

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेची १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र इतर घटकांकडून त्याच दिवशी परीक्षा होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून २३ ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले. मात्र परीपूर्ण नियोजन न झाल्याने ही लेखी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून १९ नोव्हेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थ्यांना भुर्दंड-

लेखी परीक्षेचे परीपूर्ण नियोजन होऊ न शकल्याने ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी येणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रवासाचे, राहण्याचे नियोजन करावे लागते. हजारो परीक्षार्थ्यांनी त्याचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

आयुक्तालयात भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या जागासर्वसाधारण - १७६महिला - २१६खेळाडू - ३८प्रकल्पग्रस्त - ३८भूकंपग्रस्त - १४माजी सैनिक - १०७अंशकालीन पदवीधर - ७१पोलीस पाल्य - २२गृहरक्षक दल – ३८

परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन केले जात आहे. परीक्षार्थींना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. त्याचे परीपूर्ण नियोजन करता यावे म्हणून संबंधित व्हेंडार कंपनीने वेळ वाढवून मागितली. त्यानुसार १९ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.  - डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPoliceपोलिस