शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गुंगारा देणारे दोन सराईत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 18:19 IST

निगडी पोलीसांना पाहिजे असलेले सराईत व १ वषार्पासून गुंगारा देणारे लखन सातव व त्याचा साथीदार नितीन चंदनशिवे ओटास्किम येथे थांबलेले आहेत.

पिंपरी : पोलिसांना एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या  दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. निगडीतील ओटास्किम येथे खंडणी दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन ऊर्फ  विकास कैलास सातव (वय २२, रा. दळवीनगर, ओटास्किम, निगडी) व नितीन महावीर चंदनशिवे (वय २३, रा. रूपीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. खंडणी - दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती प्राप्त करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीसांना पाहिजे असलेले सराईत व १ वषार्पासून गुंगारा देणारे लखन सातव व त्याचा साथीदार नितीन चंदनशिवे ओटास्किम येथे थांबलेले आहेत. त्यानुसार सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली. आरोपी लखन सातव याने शरीराविरूध्दचे ३ गुन्हे व आर्म अक्टचा १ गुन्हा केल्याची माहिती दिली. आरोपी नितीन चंदनशिवे याने शरीराविरूध्दच्या २ गुन्ह्यात फरार असल्याबाबत सांगितले. आरोपी लखन सातव याच्यावर यापूर्वी निगडी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नितीन महावीर चंदनशिवे याच्याविरोधात यापूर्वी निगडी, सांगवी व चिखली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. बढे, हवालदार अजय भोसले, पोलीस नाई उमेश पुलगम, शैलेश सुर्वे, किरण काटकर, आशिष बोटके व सागर शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस