मुलांनी बनविले ‘पॉकेट मॅथ्स’ अॅप
By Admin | Updated: July 19, 2015 03:53 IST2015-07-19T03:53:58+5:302015-07-19T03:53:58+5:30
आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित ‘पॉकेट मॅथ्स’ हे मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये पाचवी ते नववीचा संपूर्ण अभ्यासक्रम, तसेच दहावीसाठी लागणारी

मुलांनी बनविले ‘पॉकेट मॅथ्स’ अॅप
पिंपरी : आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित ‘पॉकेट मॅथ्स’ हे मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये पाचवी ते नववीचा संपूर्ण अभ्यासक्रम, तसेच दहावीसाठी लागणारी समीकरणे देण्यात आली आहेत. यामुळे गणितासारखा कठीण विषयही विद्यार्थ्यांना सहजतेने समजण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्यांचा वापर त्यांनी समाजासाठी, स्वत:साठी करावा, या हेतूने कॉम्प्युटर बेस्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा उपक्रम राबवला जातो, असे शिक्षिका अनुजा भंडारी यांनी सांगितले. हे अॅप तयार करताना विनायक पाचलग, माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ ज्ञानेश्वर कानपूर्णे, संगणक विभागप्रमुख यादवेंद्र जोशी, शिक्षिका अनुजा भंडारी, रागिणी चौधरी, भाग्यश्री पंडित आदींचे सहकार्य लाभले. विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात अॅपचे उद्घाटन भूषण केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विनायक पाचलग, ज्ञानेश्वर कानपूर्णे, यादवेंद्र जोशी, अनुजा भंडारी, अमोल देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)