शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएतर्फे अनधिकृत गाळ्यांवर कारवाई   

By नारायण बडगुजर | Updated: December 23, 2024 17:03 IST

रहदारीचा व‍िचार करुन संबंध‍ितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अध‍िकारी, कर्मचारी यांनी केले.

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुण्यातील नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी (द‍ि.२३) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यात आली. यात अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा व‍िचार करुन संबंध‍ितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अध‍िकारी, कर्मचारी यांनी केले.

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गत काही द‍िवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असून संबंध‍ित बांधकामे हटविण्यात येत आहेत. नवले ब्रिज भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीए पथकाने सोमवारी द‍िलीप दादा नवले, वैशाली दांगड, सारंग नवले, अतुल चाकणकर, व‍िकास नाना दांगड यांच्यासह इतरांनी अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकले. पुणे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सच‍िन म्हस्के, रवींद्र रांजणे, पोलिस न‍िरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता विष्णू आवाड, गणेश जाधव, अभ‍िनव लोंढे यांच्यासह पोलिस कर्मचारी, अग्न‍िशमन व‍िभागाचे कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगसह बांधकामांचा सर्वे सुरु असून न‍िष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. नवले ब्रिज भागातील या कारवाईमुळे न‍िश्चितच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, असा व‍िश्वास पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिका