शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रशिक्षणाविनाच दिले स्टेअरिंग चालकांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:08 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस विविध मार्गांवर धावतात. यामध्ये खात्याच्या, तसेच ठेकेदाराच्या बसचाही समावेश आहे.

- मंगेश पांडेपिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस विविध मार्गांवर धावतात. यामध्ये खात्याच्या, तसेच ठेकेदाराच्या बसचाही समावेश आहे. मात्र, ठेकेदाराच्या बसवरील चालकांना प्रवासी बस चालविण्याचे प्रशिक्षणच दिले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठेकेदाराकडील चालक प्रशिक्षणाशिवायच बस चालवीत असून, एकप्रकारे पीएमपी प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी पीएमपी बसचा सक्षम सुविधा आहे. शहरातील विविध मार्गांवर बस सोडल्या जात असून, यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होत आहे. दरम्यान, अनेक नागरिक खासगी वाहनांचा वापर न करता पीएमपी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, या बसचा प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.ठेकेदाराकडील चालकांना ट्रेनिंगच दिले जात नसल्याचे समोर येत आहे. सध्या पीएमपीएमएलला वेगवेगळ्या पाच ठेकेदारांकडून बस पुरविल्या जातात. सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी ४३० बस ठेकेदाराच्या मार्गावर धावत असतात. यामध्ये बीआरटीएस मार्गावरील ३०० बसचाही समावेश आहे. ठेकेदाराच्या ४३० बसवर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन शिफ्ट मिळून ८६० चालक असतात.मात्र, या चालकांना खात्याच्या चालकांप्रमाणे प्रवासी बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराकडे एखादा चालक नोकरीसाठी आल्यास त्याला रुजू करून घेत थेट पीएमपी बसचे स्टेअरिंग त्या चालकाच्या हाती दिले जाते. त्यामुळे थांब्यावर बस थांबविणे, बीआरटीएस मार्गात बस चालविणे, मार्गावरील बसथांबे आदींबाबत चालक अनभिज्ञ असतात. यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होते. तसेच प्रशिक्षित चालक नसल्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचाही प्रकार सुरू आहे. तर, पीएमपीकडे असलेल्या खात्याच्या बसवरील ३ हजार चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.एकच बस बॅचबिल्ला वापरतात अनेक चालक१प्रवासी बस चालविण्यासाठी वाहन परवान्यासह बॅचबिल्ला आवश्यक असतो. मात्र, ठेकेदाराकडील अनेक चालकांकडे बॅच बिल्ला उपलब्ध नाही. त्यामुळे इतर चालकांचा बॅचबिल्ला घेऊन मार्गावर बस चालविली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या चालकांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.२बीआरटीएस मार्गिकेतून धावणाºया बसवरील चालकांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, प्रशिक्षण न देताच चालकांच्या हाती बस दिली जाते. त्यामुळे थांब्यापासून एक ते दीड फूट दूर अंतरावर बस थांबविणे, प्रवासी बस बसमध्ये बसला अथवा उतरला आहे की नाही याची खात्री न करताच बस हलविणे असे प्रकार घडत असतात. काही चालक तर बीआरटीएस मार्गिकेतून बस चालविताना अक्षरश: गोंधळून जातात. या मार्गिकेचा अंदाज येत नसल्याने वेग कमी कमी करून कशीबशी बस मार्गिकेच्या बाहेर काढली जाते, अशी विदारक स्थिती दिसून येते.३प्रवासी बस चालविणे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. पीएमपीकडील खात्याच्या चालकांना तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, ठेकेदाराकडील चालकाला कोणत्याही प्रकारचे प्रवासी बस चालण्यिाचे प्रशिक्षण दिले जात नाही. प्रशिक्षणाविनाच चालकाच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाते, अशी धक्कादायक माहिती पीएमपीएमएलच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.पीएमपीकडून खात्याच्या चालकांना दिले जाणारे प्रशिक्षणनवीन भरती ट्रेनिंग१ महिनाउजळणी प्रशिक्षणदरवर्षी ३ दिवसपीएमपीच्या खात्याच्या चालकाप्रमाणे ठेकेदाराकडील चालकाला पीएमपीकडून प्रशिक्षण द्यायचे असल्यास प्रतिचालक २०० रुपये इतका खर्च येऊ शकतो. हा खर्च कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याने ठेकेदाराकडून प्रशिक्षणाविनाच चालकाच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जात आहे.खात्याचे चालक ३०००ठेकेदाराकडील चालक - ८६०बीआरटी बसवरील खात्याचे चालक - २००ठेकेदाराचे चालक - ३००

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड