शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पालखी मार्गावरील झाडे मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:43 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्याअभावी दुभाजकातील हिरवळ सुकली; आळंदी-दिघी रस्त्यावरील समस्या

दिघी : आळंदी-दिघी पालखी मार्गाच्या रुंदीकरणात शेकडो झाडांवर कुºहाड कोसळली. त्यामुळे हिरवळीने गर्द झालेला रस्ता अचानक ओसाड वाटू लागला. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी झाडे मुळासकट उपटून त्यांचे दुसऱ्या जागेत पुनर्रोपण करण्यात आले.रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना पालखीमार्गावरील दुभाजक व मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. मात्र महापालिकेच्या निर्दयी प्रशासनाने या वृक्षांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी पाण्याअभावी पालवी फुटलेली झाडे मृतावस्थेत जात आहेत.

रस्ता रुंदीकरण करताना किंवा अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधीत झाडे तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. मात्र पुनर्रोपण केल्यानंतर या झाडांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी-दिघी पालखी मार्गावरील पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे पाणी आणि देखभालीअभावी सुकली आहेत. तसेच या मार्गावर झाडांचे पूर्ण पुनर्रोपण करण्यात आलेले नाही आणि नव्याने रोपणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरील दुभाजक ओसाड पडले आहेत.आळंदी-दिघी मार्गावरील वडमुखवाडी येथील साई मंदिर ते दिघीतील मॅगझिन चौकातील डोंगराच्या बाजूला मोकळ्या जागेत या स्थलांतरीत वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. ज्या झाडांच्या मुळ्या रूजल्या ती झाडे पालवी फुटून बहरत आहेत. बोडख्या झालेल्या फांद्या हिरवाईने नटू पाहत आहेत. मात्र पाण्याअभावी अशा अवस्थेत त्यांचे आयुष्य संपल्यात जमा आहे. काही झाडे उन्मळून पडली आहेत. दुभाजकांमधील व रस्त्याच्या बाजूला लावलेली झाडांची अवस्था पाण्याअभावी सुकून, पाने गळून पडली आहेत. झाडांना आळे नाहीत, दगडधोंड्यांचा खच झाडांच्या बुंध्याशी पडून आहे. मोझे शाळेलगत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली दहा फूट उंच झाडे आधार नसल्याने कोलमडून पडली आहेत. मॅगझिन चौकापासून दत्तनगरकडे जाणाºया रस्त्यावर उजव्या बाजूला वृक्ष लागवड केली गेली. मात्र काही व्यावसायिकांनी जागा काबीज करीत येथे व्यवसाय सुरू केला आहे. अंधाराचा फायदा घेत काही नागरिक परिसरात कचरा टाकतात. त्यामुळे या झाडांना बाधा पोहचत आहे. हा कचरा झाडांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे येथील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.यंत्रणेचा पूरेपूर वापर नाही1वृक्षारोपणासह त्यांच्या संवर्धनावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. असे असतानाही या यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात येत नाही. परिणामी वृक्षसंवर्धन होत नाही. पुरर्रोपण करून किंवा रोपांची नव्याने लागवड करूनही फारसा उपयोग होत नाही. काही दिवसांतच ही झाडे सुकतात. मृतावस्थेतील ही झाडे महापालिकेकडून लगेच हटविण्यात येतात.लागवडीपेक्षा झाडे हटविण्याची मोहीम2आळंदी-दिघी पालखी मार्गावरील दुभाजकांमध्ये लावलेली झाडे सुकून गेल्याने ती लगेच हटविण्यात आली होती. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक झाडे सुकली आहेत. काही झाडे मृतावस्थेत आहेत. ही सर्व झाडे महापालिका प्रशासनाकडून हटविण्यात येतील. त्यामुळे हा मार्ग आणखी ओस होणार आहे. महापालिका प्रशासनाने लागवडीपेक्षा झाडे काढण्याची मोहीम सुरू केली आहे का, असा उपरोधिक प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.झाडांभोवती खडी, पेव्हिंग ब्लॉक3दत्तनगरपासून विठ्ठल मंदिरकडे जाणाºया रस्त्यावरील दुभाजक मात्र झाडांअभावी ओस पडले आहेत. रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली झाडांना मातीचा अभाव असल्याचे दिसून येते. वृक्षलागवड करताना काळ्या मातीचा भराव टाकला नाही. रस्त्यावरील खडी, सिमेंटचे ब्लॉक, विटांच्या तुकड्यांचा खच झाडाभोवती टाकलेला तसाच पडून आहे. वृक्षारोपण करण्याची ही अनोखी पद्धत महापालिका प्रशासनाने कधीपासून अस्तित्वात आणली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अशा पध्दतीमुळे या झाडांचे संवर्धन होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही झाडे सुकून मृतावस्थेत आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे