पिस्तूलविक्री करणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: June 15, 2016 04:59 IST2016-06-15T04:59:21+5:302016-06-15T04:59:21+5:30
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदापणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या आरोपींना निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) दुपारी

पिस्तूलविक्री करणाऱ्यांना अटक
आकुर्डी : आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदापणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या आरोपींना निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) दुपारी साडेतीनच्या सुमारास आकुर्डी स्टेशनजवळ करण्यात आली. बाळू जगन्नाथ वाघमोडे (वय २२, जि. सोलापूर), संदीपसिंह दिनेशसिंह बदोरिया (वय १९, मध्यप्रदेश) आणि उपदेशसिंह बदोरिया (वय १९,रा. मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने तीन युवकांना गावठी पिस्तूलसह पकडले. (वार्ताहर)