शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत ; ढिसाळ नियोजनाने पाण्याचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 05:04 IST

पाण्याची मुबलकता असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरवासीयांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे.

संजय माने पिंपरी : पाण्याची मुबलकता असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरवासीयांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत नागरी सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यातील पाणी ही अत्यावश्यक बाब असून, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया शहरात उन्हाळ्यापूर्वीच पाण्यावाचून हाल सुरू आहेत.पिंपरी-चिंचवड शहराच्या जवळ मावळात पवनानगर धरण आहे. या धरणात पाण्याचा पुरेसा साठा आहे. शहराची पुढील काळातील वाढती लोकसंख्या विचारात घेता अतिरिक्त पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे भविष्यातील २० वर्षांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. त्यानुसार महापालिका प्रशासन, तसेच तत्कालीन महापालिकेतील सत्ताधारी यांनी नियोजन केले. परंतु त्या नियोजनानुसार कृतिशील पाऊल उचलले गेले नाही.शहराला चोवीस तास पाणीपुरवठा अशी योजना २०१३-१४ मध्ये आखण्यात आली. त्यासाठी थेट पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना होती. केंद्र व राज्य शासनाने या योजनेसाठी एकत्रित असा ४०० कोटींचा निधी मंजूर केला होता. ही योजना राबवली जात असताना, मावळातील ज्या शेतकºयांच्या जमिनीतून वाहिनी टाकली जाणार त्यांना जागेचा योग्य मोबदला देणे अपेक्षित होते. मात्र त्याचा विचार न करता, ही योजना राबविण्याचा घाट घातला गेला. साहजिकच तेथील शेतकºयांनी या योजनेस कडाडून विरोध केला. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी देण्यास विरोध नाही,परंतु शेतकºयांना त्यांचा मोबदला मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. त्याचा उद्रेक झाला. आंदोलन झाले, पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकºयांना जीव गमवावा लागला. परिणामी शासनाचा स्थगिती आदेश आल्याने ही योजना बारगळली.शहरात अनधिकृत बांधकामे थांबलेली नाहीत. त्यासाठी वापरात येणारे पाणी महापालिकेचे आहे. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. असे असताना पाणीपट्टी दरवाढ करून नागरिकांवर वाढीव कराचा बोजा टाकला जात आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता असूनही शहर तहानलेले अशी अवस्था येथील नागरिकांची आहे.नियोजनाप्रमाणे प्रकल्पाचे काम होणे अपेक्षित होते, चार वर्षांत लोकसंख्या वाढली. एवढेच नव्हे, तर बांधकामेही वाढली. नागरीकरण वाढत गेले, पाणीपुरवठा योजना मात्र वेळीच कार्यान्वित होऊ शकली नाही. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत निधी आला. या योजनेचा कालावधी संपला, तरी बंदिस्त जलवाहिनी पाणीपुरवठा योजनेचे भिजत घोंगडे तसेच राहिले. ज्यांच्या काळात शेतकºयांचे आंदोलन झाले, त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे योजना बारगळली असे मानले, तरी सत्तांतर झाल्यानंतर त्यावर तोडगा निघणे अपेक्षित होते.अर्धवट राहिलेला हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आणखी पाण्याची गरज भासल्यास भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याचा पर्याय विचारात घेतला पाहिजे. असे न करता, श्रेय आपल्यालाच मिळावे, या उद्देशाने नव्या पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater transportजलवाहतूक