शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेची मिळकत सवलत योजना फसवी, शिवसेनेचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:04 IST

मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्याप झाली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे मिळकतकर बिलांची छपाई अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्टीकरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जूनअखेर कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात दहा टक्के सवलत जाहीर केली आहे. ही योजना फसवी असल्याची टीका शिवसेनेने स्थायी समितीत केली. मिळकतधारकांना बिलेच दिली नाहीत मग सवलत कशी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. त्यावेळी छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यात बिलाचे वाटप करणार असल्याचे उत्तर महापलिका प्रशासनाने दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आगामी वर्षाचा मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना सवलत योजना जाहीर केली आहे. सवलत योजना, वसुली जनजागृतीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने एफएम रेडिओ या माध्यमाचा वापर करण्याचे ठरविले आहे. जून महिन्यात कर सवलतींची माहिती मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. यासाठी नऊ लाख ३४ हजार खर्च येणार आहे. याविषयीचा विषय स्थायी समितीसमोर चर्चेला आला असताना शिवसेनेचे अमित गावडे यांनी प्रशासनास धारेवर धरले.  गावडे म्हणाले, महापालिकेने मिळकतधारकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह दोन्ही सहामाही बिलांची रक्कम ३० जूनपर्यंत एकरकमी भरल्यास सामान्यकरात सवलत मिळणार आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्याप झाली नाही. बिलांची छपाई कधी वाटप कधी होणार  त्यामुळे मिळकतकर विभाग प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मिळकत भरणाऱ्या धारकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने यापूर्वीच बिलांची छपाई करून मिळकतधारकांना वाटणे गरजेचे होते. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनशून्य प्रशासनामुळे पालिकेच्या तिजोरीतदेखील कराचे पैसे जमा होत नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही. ही योजना फसवी ठरली आहे.करसंकलन विभागाच्या प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर म्हणाल्या, मिळकतकर बिलासंदर्भात सभेत चर्चा झाली. त्यावेळी मिळकतकर बिलांची छपाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. छपाईनंतर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात बिलांचे वाटप करण्यात येईल. 

टॅग्स :PuneपुणेTaxकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना